गुन्हेमहाराष्ट्रसामाजिक

तीन कॉलेजेसच्या परिसरातच जुगार अड्डा असल्याचे समजूनही शिक्रापूर पोलीस मख्खच; आता प्रतीक्षा पोलीस महासंचालकांच्या कारवाईची 

पुणे : कोरेगाव भीमा येथे पिंपळे जगताप रोडवर तीन कॉलेजेसच्या परिसरात जुगार माफिया बिनधास्त तीन पानी पत्त्याचा क्लब चालवत आहेत. ग्रामीण पोलिसांचे या अवैध धंद्याकडे संपूर्ण दुर्लक्ष आहे. याबाबत मीडिया मध्ये माहिती प्रसारित होऊनही पोलीस मख्ख असल्याने सर्वोच्च पातळीवरील कारवाईची मागणी होत आहे. जितेंद्र पानसरे नामक पोलीस फौजदार या साऱ्या अवैध धंद्यामागे असल्याचे बोलले जाते. तो शिक्रापूर परिसरात मोठ्या प्रमाणात हप्ता वसुली करुन अवैध धंद्यांना अभय देत असल्याने सामान्य नागरिकांना उपद्रव होत आहे. पुरस्कार प्राप्त पुणे ग्रामीण एलसीबीचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांचाही त्यात समावेश असल्याची धक्कादायक चर्चा आहे.

https://x.com/Samajik_news/status/2025600844293664809?t=BEcub-BSVuDDegViOWewwA&s=19

https://x.com/Samajik_news/status/2025600844293664809?t=BEcub-BSVuDDegViOWewwA&s=19

शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये हा जुगार अड्डा दिवस रात्र सुरू आहे.‌ पैसे लावून तो खेळला जातो. या ठिकाणी जुगार खेळण्यासाठी पुण्यातील वेगवेगळ्या भागातून मोठ्या प्रमाणात जुगारी येत आहेत. यामध्ये अनेक गुंड, मवाली असून त्यांचा या ठिकाणी वावर अधिक वाढत चालला आहे.

पिंपळे जगताप रोडवर अल-अमीन एज्युकेशनल मेडिकल कॉलेज आहे. याच कॉलेज पासून हाकेच्या जुगार अड्डा दिवसाढवळ्या सुरू आहे. काशिद याचे फार्म हाऊस असून त्यात बापू भांडलकर आणि मख्खनसिंग जुगाऱ्यांना आश्रय देत आहेत. अल-अमीन एज्युकेशनल मेडिकल कॉलेजसह शरदचंद्रजी पवार कॉलेज ऑफ बी.एड. आणि न्यूलाइफ हॉस्पिटल अँड आयुर्वेदिक कॉलेज अशी तीन कॉलेजेस या ठिकाणी आहेत. या ठिकाणी अनेक विद्यार्थी शिकण्यासाठी येतात. या परिसरामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.

स्थानिक पोलीस प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची दंडात्मक कारवाई केली जात नाही. जुगार अड्ड्यावर तात्काळ  कारवाई करावी अशी पोलिसांना मागणी करून वैतागलेले पालक मंडळी आता स्थानिक राजकीय नेत्यांना विनंती करत असून त्यांचेही दुर्लक्ष आहे.

वसुलीच्या विरोधात आंदोलन करुनही ग्रामीण पोलीस वरिष्ठ दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या खास पथकामार्फत जुगार धंद्यावर कारवाई करावी अशी मागणी केली जात होती, तरीही काही कारवाई होत नाही. त्यामुळे आता पोलीस महासंचालकांच्या विशेष पथकामार्फ कारवाईची मागणी होत आहे.

Related Articles

Back to top button