शहीद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आजादांना ‘भारतरत्न’ द्यावे, वंदे मातरम संघटनेकडून मागणी

पुणे : शहीद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आजाद, क्रांतिकारी विष्णू गणेश पिंगळे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे ही मागणी वंदे मातरम संघटनेकडून पत्रकार परिषदेत करण्यात आली.
वंदे मातरम् संघटना संयुक्त युवा फिनिक्स सोसायटी ट्रस्टच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या ‘व्यर्थ ना हो बलिदान देशभक्ती पुरस्कारांची पत्रकार परिषदेत घोषणा करण्यात आली.
(जीवनगौरव पुरस्कार) एअर मार्शल भूषण गोखले (राजकीय पुरस्कार) उल्हासदादा पवार (सामाजिक पुरस्कार )महेंद्र पिसाळ (आरोग्य दूत पुरस्कार) मंगेश चिवटे {शैक्षणिक पुरस्कार )सुधीर काळकर यांना जाहीर करण्यात आले.
पुरस्काराचे स्वरूप जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पगडी, सन्मानचिन्ह, तुळशीचे रोप, शहीद भगतसिंग यांचे पुस्तक व उपरणे असे आहे. सदर पुरस्कार हे वंदे मातरम् संघटनेचे सर्व सहकाऱ्यांच्या हस्ते मान्यवरांच्या घरी व संपर्क कार्यालयात जाऊन देण्यात येणार आहेत.
पत्रकार परिषदेस वंदे मातरम् संघटनेचे प्रदेश अध्यक्ष सचिन जामगे, पुणे शहर अध्यक्ष अमोल जगताप, कार्याध्यक्ष मोहित काकडे, ऋषिकेश देशपांडे, आकाश जामगे उपस्थित होते.




