महाराष्ट्र

लॉकडाऊनबाबत अफवा पसरवल्यास फौजदारी कारवाई

मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट इशारा

मुंबई : सोशल मीडियावर देशात लॉकडाऊन लागू होणार असल्याची अफवा पसरवली जात असल्याने पेट्रोल पंपांवर नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत. यावर स्पष्टीकरण देताना फडणवीस म्हणाले की, मध्य पूर्वेतील युद्धामुळे भारताच्या शेजारच्या देशात शटडाऊनची परिस्थिती आली आहे. मात्र, आपल्या केंद्र सरकारने उत्तम व्यवस्था केली आहे. लोकांनी विनाकारण पेट्रोल पंपांवर गर्दी करू नये. आपल्याकडे एक महिना पुरेल एवढा इंधन साठा आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. लॉकडाऊन लागणार नाही, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. याबद्दल खोटी माहिती पुरवणे गुन्हा ठरेल असाही त्यांनी इशारा दिला आहे.

मध्य पूर्वेतील युद्धाच्या पार्श्वभूमीवर जगभरात इंधनाचे दर गगनाला भिडले असताना आणि अनेक देशांमध्ये आणीबाणीची स्थिती असताना, भारताने मात्र आपले इंधन व्यवस्थापन अत्यंत चोख ठेवले आहे. यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले असून सध्या सोशल मीडियावर पसरवल्या जाणा-या लॉकडाऊनबाबतच्या अफवा फेटाळून लावल्या आहेत. देवेंद्र फडणवीस म्हणाले की जगभरात युद्धाची परिस्थिती असताना इंधन दरवाढीचे संकट उभे ठाकले आहे. अशा कठीण काळात भारत सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात घट करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला, त्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो. आपल्या शेजारील देशांमध्ये इंधनाच्या कमतरतेमुळे शाळा, कार्यालये आणि संस्था बंद करण्याची वेळ आली आहे, मात्र भारताने उत्तम व्यवस्थापनामुळे अशी वेळ येऊ दिली नाही.

‘भारतात लॉकडाऊन होणआर असल्याच्या अफवा पूर्णपणे खोट्या आहेत. भारत सरकारकडून असा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही.’

केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत याबद्दल अधिकृत भूमिका मांडली. ते म्हणाले, ‘भारतात लॉकडाऊन होणआर असल्याच्या अफवा पूर्णपणे खोट्या आहेत. भारत सरकारकडून असा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही.’

हरदीप सिंग पुरी यांनी, नागरिकांना शांत आणि जबाबदारीने वागण्याचे आवाहन केले. अशा परिस्थितीत जर कुणी अफवा पसरवून घबराट निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर ते बेजबाबदार आणि हानिकारक कृत्य आहे, असेही ते म्हणाले.

हरदीप सिंग पुरी पुढे म्हणाले, ‘जागतिक परिस्थिती सध्या अनिश्चित असली तरी आम्ही ऊर्जा, पुरवठा साखळी आणि महत्त्वाच्या उत्पादनांशी निगडित परिस्थितीवर नजर ठेवून आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार देशात इंधन, ऊर्जा आणि इतर आवश्यक बाबींचा योग्य पुरवठा होईल, याची काळजी घेत आहे. कोणत्याही अडथळ्यांशिवाय ऊर्जा पुरवठा सुरू आहे. कोणत्याही आव्हानांचा सामना करण्यासाठी आपण तयार आहोत.’

ऊर्जा संकटामुळे भारतात पुन्हा लॉकडाऊन? पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर टाळेबंदीची आवई कशी उठली?

भारताने यापूर्वीही जागतिक संकट काळात एकजुटीने उभे राहण्याची किमया करून दाखवली आहे. पुढेही अशी काही परिस्थिती उद्भवल्यास आपण त्याचा योग्यरित्या सामना करू, असेही ते म्हणाले.

Related Articles

Back to top button